जळगाव- धुळे जिल्ह्यातील साकरी जवळ जळगाव शहरातील तेल व्यापार्याचा कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. यात तीन ते चार जण जखमी आहेत. शांतीलाल नानाभाई सुरतवाला वय-65 रा. यशवंत कॉलनी असे मयताचे नाव आहे.
शांतीलाल नानाभाई सुरत हे शहरातील पराग ऑईलचे संचालक होते. नातचे सुरत येथे लग्न असल्याचे ते 9 डिसेंबर रोजी सुरत येथे कारने गेले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी, कंपनीतील कर्मचारी, लहान बालक, व ड्रारव्हर हे सोबत होते. नातचे लग्न आटोपून शांतीलाल हे मंगळवारी जळगावसाठी सकाळी सुरत येथून निघाले. यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्र्ी गावाजवळ सकाळी त्यांच्या कारचा अपघात झाला. यात शांतीलाल यांना अपघात जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील इतर चार जण जखमी झाले. सकाळी कुटूंबियांना मृत्यूची बातमी मिळताच त्यांनी मन हेलवणारा आक्रोश केला. नातेवाईकांनी यशवंत कॉलनी येथील घरी सकाळी एकच गर्दी केली होती. शांतीलाल सुरतवाला यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. यातच त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे त्यांच्या काही नातेवाईकांचे म्हणणे होते.
Next Post