…तेव्हाच माझे काम संपेल : आमटे

0

वाकड : आपल्या कामातून आदिवासी बांधवांच्या मनात विश्‍वास निर्माण करुन त्यांच्या आयुष्यात आनंद आणू शकलो याचं समाधान मोठं आहे. त्यामुळे आदिवासी बांधव स्वतंत्र आणि स्वावलंबी झाल्याचं चित्र आहे. त्यांची पुढची वाटचाल ते जेव्हा निर्भयपणे, आत्मविश्‍वासाने व स्वतःच्या बळावर करतील तेव्हाच आमचे येथील काम पूर्ण झाले असे मला वाटेल, असे मत डॉ प्रकाश आमटे यांनी केले.

वाकड विनोदे नगर येथील गजराबाई निवृत्ती विनोदे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याचा मानपत्र देऊन विशेष सन्मान व गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. आमटे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार नानासाहेब नवले होते.