तेव्हा ऊसतोड महामंडळाची स्थापन का केली नाही?

0

पुणे । ऊसतोड कामगाराचे नेतृत्व वारशाने माझ्याकडे आले अशी टीका केली जात आहे. यामध्ये राजकारण केले जात असून ऊसतोड कामगारांचे महामंडळ काढण्याची कल्पना साहेबांची होती. ज्यावेळी विरोधकांकडे सत्ता होती त्यांना महामंडळ स्थापन करण्याचे सुचले नाही. त्यांनी महामंडळांची स्थापना केली असती तर ऊसतोड कामगारांचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले असते. अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केली.

58 हजार युवकांना प्रशिक्षण देणार
दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना राबविण्याच्या दृष्टीने शासनाकडून पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी कार्यशाळेतील अधिकार्‍यांना मुंडेंनी मार्गदर्शन केले. तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने बीड, नागपूर, पुणे जिल्ह्यातील तरुणांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना ट्रेनिंग देण्यात येत आहे. तसेच 2019पर्यंत 58 हजार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. ग्रामीण कौशल्याने उद्योगांना ताकद देणार आहे. मागील तीन वर्षांत 7 हजार 500 युवकांना ट्रेनिंग दिले आहे. तसेच तरुणांना नोकरी देण्यात आल्याची माहिती मुंडेनी दिली. शहरातील बालकांना पुरविण्यात येणार्‍या सुविधेची माहिती घेऊन सुविधा उपलब्ध नसल्यास कारवाई करण्याचा इशारा पंकजा मुंडेनी दिला आहे. ज्या योजनांचा लाभ लाभार्थींनी घेतला आहे. ते खरे आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने एकत्रित केलेली माहिती आणि लाभार्थी योग्य आहेत. त्यामुळे विरोधकांची टीका योग्य नाही. उलट विरोधकांनी इतका प्रचार माध्यमात केल्यामुळे, त्यांच्या टीकेमुळे शेतकर्‍यांना मनस्ताप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी मी कोणत्याही मंचावर येण्यासाठी तयार असून धनंजय मुंडेच्या सूचनेवर विचार करण्याचे उत्तर पंकजा मुंडेनी यांनी यावेळी दिले.

लवादाविषयी फक्त राजकारण…
ऊसतोड मजूर संघटना वारसा हक्क माझ्याकडे नाही. ऊसतोड कामगारांची अडचण ज्यांना समजली नाही, ते लवादाचे प्रमुख झाले आहेत. अशी टीका धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी पुण्यात केली होती. त्यावर उत्तर देताना पंकजा यांनी ऊसतोड कामागारांबद्दल प्रचंड आस्था आहे. त्यांचे नेतृत्व करत आहे. गेल्या वर्षीच्या ऊसतोड कामगार आंदोलनात संपाला पाठिंबा देण्यासाठी माझा कारखाना बंद ठेवला होता. तेव्हा काही लोकांना लवादाविषयी फक्त राजकारण करायचे आहे. ते त्यांनी करण्याची खोचक सूचना त्यांनी केली.