मुंबई : इतरांच्या तुलनेत स्टारकिडसाठी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं काहीसं सोपं असतं. मात्र, इतरांना तो पल्ला गाठण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. दीपिकाने चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी वयाच्या १८ व्या वर्षीच मुंबईला जायचं ठरवलं. तिच्या याच प्रवासाबद्दल दीपिका आणि तिचे वडिल बॅडमिंटनपटू प्रकाश पादूकोण यांनी आपले अनुभव सांगितले आहेत.
मी लहान वयात घराबाहेर पडतीये त्यामुळे माझ्या पालकांना माझ्या काळजीने अनेक रात्री झोपही आली नाही. पण मला आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचं होतं आणि मला माझं ध्येयही माहिती होतं. मला कुठे जायचे आहे हे नेमके माहित असल्याने मी जास्त विचार न करता निर्णय घेतला.
दीपिकाचे वडिल प्रकाश पादूकोण याबद्दल बोलताना म्हणाले, तिने चित्रपटसृष्टीत जायचे ठरवले आणि त्यासाठी मुंबईला जाण्याचेही ठरवले. त्यावेळी ती केवळ १८ वर्षांची होती. मुंबईत तिला राहण्यासाठी जागाही नव्हती त्यामुळे आम्हाला तिची काळजी वाटायची. आमच्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय पचवणे काहीशी अवघड गोष्ट होती. मात्र, आता तिने घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो, असे म्हणत त्यांनी दीपिकाच्या या निर्णयाचे कौतुक केले.