शहादा । झोपडपट्टीत राहणाल्या एका मजुराला तब्बल 1 लाख 31 हजारांचे वीज बील पाठवून वीज वितरण कंपनींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. याबाबत दै. जनशक्तिने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अभियंता ई.जी.चव्हाण यांनी अधिकार्यांना धारेवर धरत ते वादग्रस्त वीजबील रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
कंपनीचा तक्रार करूनही दुसर्यांदा घोळ!
शहरातील सालदार नगरात युवराज पानपाटील हे अनेक वर्षापासून साधारण झोपडीत राहून लोटगाडीवर मोल मजुरीवर उदनिर्वाह करीत आहे. घरात कुठल्याही चैनीच्या वस्तू नाहीत. वीज वितरण कंपनीचे रीतसर मीटर बसवून नियमित येणारे विजबिल भरायचे. मात्र, फेब्रुवारी महिण्यात वीज कंपनीने चक्क 1 लाख 25 हजार रूपये बिल पाठविले. जानेवारी 2018 ला 500 रूपये कंपनीचे विजबिल आल्याने सदर ग्राहकाने भरलेही. सव्वा लाखाच्या बिलाची तक्रार संबंधित अधिकार्याकडे केल्याने 500 रुपये भरण्याची सक्ती केली पुढील महिन्यात वाढीव जास्तीचे वीज बिल येणार नाही असे सांगितले. मात्र, पुढच्या महिन्यात सव्वा तब्बल 1 लाख 31 हजारांवर हे बील गेल. या ग्राहकाचे वीज मीटर रिडिंग नुसार चालू महिन्यात 100 युनिट फिरले आहे. झोपडीत राहणार्या 1लाख 31 हजाराचे हा ही एक चर्चेचा विषय ठरला अखेर दै. जनजशक्तिने या संदर्भात आवाज उठविला व 4 मार्चच्या जनशक्तिच्या अंकात ‘हातलॉरी धारकाला विजकंपनीचे सव्वा लाखाचे विजबिल‘ या मथळयाखाली व्रुत प्रसिद्ध केले होते. याची दखल वीज वितरण कंपनीचे नंदुरबार जिल्हा मुख्य कार्यकारी अभियंता ई. जी. चव्हाण यांनी घेवून शहादा वीज कंपनी कार्यालयाला भेट घेऊन संबंधित अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी करून झाडाझाडती घेतली. तसेच झोपडीत राहणार्या युवराज पानपाटिल यांचे 1 लाख 31 हजाराचे रद्द करुन यापुढे असा प्रकार घडु नये व होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. युवराज पानपाटिल यांनी दै. जनशक्तिचे आभार मानले आहेत.