मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात छोटा पण सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणार स्टार म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान सध्या आघाडीवर आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सूक असतात. तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतं असतात.
करण जोहरच्या चॅट शोमध्ये सैफ अली खानने आपल्या लाडक्या तैमुरबाबत एक खुलासा केला आहे. जेव्हा सैफला तैमुरच्या एका फोटोची किंमत माहित पडली तेव्हा तो सुद्धा थक्क झाला. तैमुरचा कुठलाही फोटो सोशल मीडियावर येतो, त्याची किंमत १५०० रुपये प्रती फोटो आहे. सैफनुसार याबाबतची माहिती त्याचे सासरे रणधीर कपूर यांनी दिली होती.
काही दिवसांपूर्वी सैफ मस्करीत तैमुरबद्दल म्हणाला होती की, जर तैमुरला माध्यमातून चांगली कमाई होत असेल तर त्याला काहीही अडचण नाही. तो म्हणाला, माझ्या चित्रपटात आपण प्रेक्षकांना तैमुरला दाखवू शकतो. यावर करिना उत्तर देत म्हणाली, इतने भी चीप न बनो. मात्र, दोघांचा हा संवाद मस्करीत चालला होता.