मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा लाडका छोटा नवाब तैमुर अली खानचा आज दुसरा वाढदिवस आहे. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला होता. तैमूरची लोकप्रियता एका बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीये.
सध्या तैमुर सैफ आणि करीना सोबत साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. तैमुरच्या प्री-बर्थ डे सेलिब्रेशनही झाला. या पार्टीत इनाया नाओमी खेमू, आई सोहा अली खानसह हजर होती. रणवीजय सिंगची मुलगी काइनाथ सिंग, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य कपूर आणि इतर स्टार किड्स हजर होते. सोशल मीडियावर त्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.