BREAKING: तैवानने चीनचे विमान पाडले; पायलट ताब्यात

0

तैपेई: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या लढाऊ विमान सुखोईला पाडल्याचा दावा तैवानने केला आहे. चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तैवाने ते विमान पाडले, या घटनेत पायलट जखमी झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आज शुक्रवारी ४ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

चीनबरोबर मागील बऱ्याच काळापासून सुरु असणाऱ्या संघर्षानंतर तैवानने आज चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचे वृत्त आले. चीन आणि तैवानने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तैवानने आपल्या हवाई हद्दीत शिरलेल्या चीनच्या सुखोई-३५ वर निशाणा साधत ते पाडले आहे. या हल्ल्यासाठी तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.

तैवानने चीनला अनेकदा हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने अखेर हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानाला लक्ष्य केलं. यामध्ये विमानाचा पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.