तोंडापूर येथे 50 हजारांची रोकड लांबविली : एकाविरोधात गुन्हा

पहूर : तोंडापूर येथे एकाने महिलेच्या बंद घरातून 50 हजारांच्या रोकडसह कागदपत्रे लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरातून रोकड लंपास
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे सुनीता सुरेश गायकवाड (45) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून रविवार, 24 एप्रिल रात्री 8.30 ते 26 एप्रिल सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या गावातील गणेश उत्तम जाधव याने घरात कुणीही नसतांना प्रवेश करून घरातील 50 हजारांची रोकड आणि इतर कागदपत्रे लांबवली. या प्रकरणी सुनीता गायकवाड यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गणेश जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार अनिल सुरवाडे करीत आहे.