पुणे । पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील भाजपच्या नगरसेविकेला तिच्याच वॉर्डात राहणार्या एका तरुणाने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी शिवीगाळ करत बळजबरी केली. तसेच प्रेमसंबंध नाकारल्यास तोंडावर अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी नगरसेविकेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विनायक विलास चिव्हे (29, रा. रेंजहिल्स, खडकी, पुणे) याला अटक केली आहे. विनायक हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खडकी परिसरात वावरतो. काही दिवसांपूर्वी त्याने नगरसेविकेचा हात पकडून जबरदस्ती केली. तसेच ‘तू माझ्याबरोबर प्रेमसंबंध ठेव’ नाहीतर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे नगरसेविकेने विनायकविरोधात पोलिसांत तक्रार दिली.