तोगडीयांचा न्यायमूर्ती लोया करायचा होता का?

0

मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय निरूपम यांचा सवाल

मुंबई :- विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाचे नेते डॉ. प्रविण तोगडीया यांचाही न्यायमूर्ती लोया करायचा होता का? असा सवाल मुंबई कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे. आपल्या विरोधकाला संपविण्यासाठी भाजपाकडून अशा पद्धतीने लोकांचा जीव घेतला जाणे हे खूपच वाईट असून प्रविण तोगडीया प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी निरूपम यांनी केली आहे.

डॉ. प्रविण तोगडीया यांना झेड प्लस सुरक्षा आहे. झेड प्लस सुरक्षा असलेले तोगडीया हे रात्री अचानक गायब होतोत आणि हॉस्पीटल मध्ये बेशूद्ध अवस्थेत सापडतात अशा परिस्थितीमध्ये तोगडीया यांचा देखील न्यायमूर्ती लोया करायचा होता का असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला असल्याचे संजय निरूपम यांनी सांगितले आहे.

भारतीय जनता पार्टी ही आपल्या विरोधकाला संपविण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते हेच यातून स्पष्ट होत असल्याचेही निरूपम यांनी म्हटले आहे. दिल्लीत सत्तेत बसलेल्या नेत्यांना तोगडीया पासून काही अडचण होती त्यामुळेच त्यांना संपविण्याचा कट करण्यात आला होता का अशा वेगवेगळ्या प्रश्नाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणीही संजय निरूपम यांनी केली आहे.

प्रविण तोगडीया यांची विचारधारा काय आहे ते कोणत्या विचारसरणीचे आहेत याच्याशी आम्हाला काही घेण देण नाही परंतू एका व्यक्तीची जीव अशा पद्धतीने घेण्यासाठी दिल्ली पासून ते अहमदाबाद पर्यंत कट रचला गेला आहे. या संपूर्ण कटाचा खूलासा होणे गरजेचे आहे असे निरूपम यांनी म्हटले आहे.