तोट्यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय

0

नवी मुंबई। नवी मुंबई परिवहन सेवेची मासिक सभा नुकतीच झाली. यासभेत एनएमएमटीचे प्रवसा भाडे वाढविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला.मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसच्या सदस्यांनी बहुमताच्या जोरावर बसच्या तिकिटात 2 ते 5 रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्ताव मंजूर केला.साध्या बसच्या तिकिटात 2 ते 5 रुपयांची वाढविण्याला मंजुरी दिली तर एसी बसच्या तिकिटात मात्र 5 ते 10 रुपयांची घट होणार आहे. हा प्रस्ताव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. शासनाने मंजुरी दिल्यास ही दरवाढ अटळ आहे.

एनएमएमटीने 2013 मध्ये दरवाढ केली होती. त्यानंतर अद्याप दरवाढ करण्यात आली नव्हती. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे परिवहन सेवेला मासिक 3.50 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन सेवेने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे,या निर्णयामुळे सर्वसामान्या प्रवाशी यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.तर तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ करणे हा पर्याय नसून,थांब्यांवरील जाहिराती, डेपोमधील दुकाने आणि अन्य मार्गानीही तोटा भरून काढता येईल, अशी सूचना परिवहन सदस्य समीर बागवान यांनी केली. ओला, सेवांमुळे अनेकांनी एसी बसकडे प्रवाश्यांनी पाठ फिरवली.