नवी मुंबई । नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडको यांच्या संयुक्त कारवाईत कोपरी गावातील 2 अनधिकृत धार्मिक स्थळ व काही बैठ्या चाळीतील घर रस्ता रुंदीकरणाच्या आड येतात म्हणून दिनांक 5मे 2017 रोजी जमीनदोस्त करण्यात आली होती. आणि जमीनदोस्त बांधकामाची जागा ही महापालिका किंवा सिडकीने ताब्यात घेयाला हवी होती. मात्र तसे न केल्याने तोडलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक मदरसा आणि एक चर्च पुन्हा बांबू चे वेदर शेड बांधून महापालिका अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चून पूर्ववत थाटात सुरू करण्यात आले आहे आहेत. आणि याकडे महापालिका अतिक्रमण विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांकडून खाजगीत बोलले जात आहे. कारण जी बैठया चाळीतील घरे तोडली आहेत त्यांना एक वीट सुद्धा पुन्हा उभी करून दिली जात नाही. आणि ही धार्मिक स्थळ तोडल्यानंतर दुसर्याच दिवशी उभी राहतात.
मदरसा, चर्च पुन्हा महापालिकेची मेहरबानी का?
वास्तविक महापालिका क्षेत्रामध्ये कुणी अतिक्रमण केले असेल तर त्यांच्या प्रशासकडून एम आर टी पी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केल्याची बरीच उदाहरणे नवी मुंबईत आहेत. मात्र कोपरी गावातील मदरसा आणि चर्च पुन्हा जाणीवपूर्वक अतिक्रमण केलं आहे त्यांच्यावर महापालिकेची मेहरबानी का? महापालिका अतिक्रमण विभाग कुणाच्या दाबावखली या बांधकांवर मेहेर नजर करीत आहे? असा सवाल ही नागरिकांडून विचारला जात आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी ही धार्मिक स्थळ पुन्हा नव्याने अतिक्रमण करून उभारली आहेत त्यांच्या वर महापालीकेच्या वतीने एम आर टी पी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री मंगेश म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.