नवी दिल्ली । सोशल मीडियाचा अविभाज्य भाग असलेल्या फेसबुकने तब्बल 30 हजार तोतयांना चांगलाच दणका दिला आहे. खोटी आणि चुकीची माहिती देणारी 30 हजार बनावट अकाऊंट फेसबुकने कायमची बंद केली आहेत. फ्रान्समध्ये होणार्या निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करणारी माहिती पसरवल्या प्रकरणी फेसबुकने ही कारवाई केली आहे.
फ्रन्स सरकारच्या दाबावामुळे फेसबुकला हे पाऊल उचलावे लागले. फेसबुकसोबतच इतरही सोशल मीडिया वेबसाईट गुगल (यू-ट्युब), ट्विटर यांच्यावरही नजर ठेवली जाणार आहे. केवळ फ्रान्सच नव्हे तर, जगभरातील इतरही देशांत जेथे फेसबुक सेवा देते अशा ठिकाणीह फेक अकाऊंटवर कारवाई केली जाणार आहे. युझर्सच्या फिड्समध्ये जाणार्या बातम्यांवरही बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. या अकाऊंटची बारीक तपासणी केली जाईल त्यानंत त्यांवर कावाई करण्यात येईल. फ्रान्समध्ये फेसबुकने गुरुवारी ही कारवाई केली. फेसबुकने जर्मनीत सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांतील दिशाभूल करणार्या बातम्यांची माहिती गोळा करण्यासाठी एक जाहिरातही दिली आहे. दरम्यान, फेसबुकला गेल्यावर्षी टीकेचा मोठा सामना करावा लागला होता. अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या टीकेला सामोरे जावे लागू नये यासाठी फेसबुकने ही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, फेसबुकने आपल्या साईटच्या माध्यमातून 1.2 बिलीयन अॅक्टिव्ह युझर्सचा आकडा पार केला आहे.
गेल्या 8 महिन्यांतच फेसबुक मेसेंजरमध्ये 200 मिलियन लोक जोडले गेले आहेत, अशी माहिती फेसबुकचे मॅनेजर डेव्हिड मार्क्स यांनी दिली आहे. डेव्हिडने सांगितले की, मेजेंजर प्रती दिन चांगलेच वापरले जात आहे. रिपोर्टनुसार, अँड्रॉइड आणि आईओएसवर फेसबुक मेसेंजर डाऊनलोडची गती प्रती वर्ष 5.66 इतकी राहिली आहे. फेसबुकचीच कंपनी व्हॉट्सअॅपबद्दल बोलायचे तर, व्हॉट्सअॅपचेही 1.2 बिलियन युझर्स आहेत. ज्यात 200 मिलियन युझर्स एकट्या भारतातील आहेत.