तोतया डेप्युटी कलेक्टरला न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । स्वत:ला डेप्युटी कलेक्टर असल्याचे सांगत पती-पत्नीमधील कौटूंबिक वाद मिटविण्यासाठी आलेल्या तोतया डेप्युटी कलेक्टर समाधान जगताप पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी पर्दाफाश केला होता. दरम्यान, आज त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यास न्यायाधीश के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणावर कामकाज होवून न्या.कुलकर्णी यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दुपारी समाधान जगताप याने जामीनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने मंजूर केला आहे.