पुणे । क्राईम ब्रँचमध्ये पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून गुलटेकडी परिसरातील सराफ व्यावसायिकांची दीड लाखांची फसवणूक करणार्या तोतया पोलिस अधिकार्याला पोलिसांनी अटक केली. विजय पाल (25, रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र मंछालाल राठोड (43, रा. शंकरशेठ रोड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा सर्व प्रकार 9 सप्टेंबर रोजी घडला होता. राठोड यांचे गुलटेकडीमध्ये सराफी दुकान आहे. पाल याने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच चोरीचे सोने विकत घेतल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दीड लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती.