तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक

0
गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
भोसरी : गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकांकडून पैसे उकळणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. 26) घडली. राजेंद्र मोहन पाटेकर (वय 55, रा. वैजयंती निवास, संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, पान टपरी यांना आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हॉटेलमध्ये फुकट खाणे, किराणा दुकानदार, पान टपरी चालक व इतर व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता. आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्तग सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलिस कर्मचारी दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.