धुळे । आम्ही सीआयडी ऑफिसर आहोत. आपल्या जवळील किंमती ऐवज जपून ठेवा असे सांगून देवपुरात एका वृद्धाला लूबाडल्याची घटना 25 रोजी घडली. वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरून तोतया अधिकार्या विरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनगीर येथील गोविंद केशवराव कासार हे 63 वर्षीय वृद्ध 25 रोजी कामानिमित्त धुळ्यात आले होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ते देवपुरातील पंचवटी कॉर्नर जवळून जात असता अचानक त्यांच्या समोर दोघे-तिघे आले. आम्ही सीआयडी ऑफिसर असून तुमच्या जवळील किंमती ऐवज सांभाळून ठेवा असे त्यांनी सांगितल्याने गोविंद कासार यांनी खिशातील डबी चाचपून पाहिली. यावेळी डबीत काय आहे असे विचारत त्यांनी हातचालाखीने डबीतील 21 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत आणि 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. या दागिन्यांची किंमत 27 हजार रुपये इतकी असून गोविंद कासार यांनी याप्रकरणी देवपूर पोलिसांत तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास उपनिरिक्षक शेख करीत आहेत.