तोरणमाळकडे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष

0

शहादा । महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ हे महाराष्ट्रासह देशभरात पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र ह्या पर्यटन क्षेत्राकडे सत्ताधारी पक्षाचे पर्यटन विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेच ह्या पर्यटनक्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे चित्र असून तोरळमाळ येथील विविध प्रेक्षणीय स्थळांची दुरावस्था झाली असून सुशोभिकरण व्हावे यासाठी प्रतिक्षेत आहे.

बेरोजगारांना रोजगारही मिळेल
तोरणमाळ पर्यटन क्षेत्रात दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक मोठ्या उत्साहाने हजेरी लावायला येतात. तोरणमाळ परिसरात असलेल्या सनसेट पाईंट, सिताखाई पाईंट, खडकी पाईंट, तसेच गोरक्षनाथ गुफा ह्या पाईटवर जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत. सदर पाईंटवर प्रेक्षकांना विरंगुळ्यासाठी छत्र्या उभारण्यात आल्या होत्या मात्र अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या छत्र्यांची पार दुरावस्था झाली आहे. तसेच रशवंत तलावात पर्रटकांना आंघोळीसाठी घाट (पारर्‍रा) बांधणे आवश्यक आहे. पर्रटन स्थळाचा पर्रटन विभागाने मनावर घेऊन विकास केल्रास स्थानिक आदिवासी व सर्वसामान्र बेरोजगार व उपेक्षितांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ह्या परिसरात स्ट्रॉबेरी सारखे पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, तसेच सिताफळ, आंबे, करवंद अशा वस्तुंच्रा विक्रीतून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.