तोरणमाळचा लाचखोर वैद्यकीय अधिकारी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

0

अतिदुर्गम भागातील भत्ता मिळाल्याने अधिपरीचालकाकडे मागितली लाच

नंदुरबार- तोरणमाळ येथील वैद्यकीय अधिकार्‍याला पाच हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ओंकार चामड्या वळवी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपी वळवी यांनी तक्रारदाराला लाच देण्यासाठी नंदुरबार सिव्हील रुग्णालयातील सर्जन यांच्या कार्यालयाजवळ बोलावले होते. तक्रारदाराने रक्कम देताच अधिकार्‍यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अतिदुर्गम भागातील भत्ता मिळाल्याने मागितली लाच
तक्रारदार हे तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात अधिपरीचालक असून त्यांना अतिदुर्गम भत्ता आठ हजार रुपयांप्रमाणे गत वर्षातील 96 हजारांपैकी 63 हजार मंजूर झाल्याने या रकमेतील 10 टक्क्क्यांप्रमाणे सहा हजार 300 रुपयांची मागणी करण्यात आली व नंतर पाच हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिरीष जाधव व पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे यांच्या पथकाने केली.