पुणे । बाजार समितीमधील महत्वाचा घटक असलेल्या तोलणार हमालांच्या जागेचा प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावावा. अन्यथा जागेच्या प्रश्नासाठी संघर्ष केला जाईल, असा इशारा कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड तोलणार पगारदार सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. आढाव बोलत हाते. यावेळी तोलणार पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. दरम्यान सेवक व सभासद कल्याण निधीतून कै. भाऊसाहेब कोल्हे यांच्या कुटुंबियांना 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, पतसंस्थेचे अध्यक्ष हनुमंत बहिरट, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष तात्या कोंडे, कार्याध्यक्ष संजय साष्टे, संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पवार, संचालक प्रमोद भांडवलकर, अंकुश लांडगे, प्रदीप आल्हाट, रमेश पोळेकर, अशोक होरड्डी, गणेश काटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत बहिरट यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.