तो मी नव्हेच !

0

अहमदनगर – कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला बुधवारपासून सुरुवात झाली असून यावेळी आरोपी जितेंद्र शिंदेने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत तो मी नव्हेचचे नाटक त्याने केल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम टप्प्यात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी न्यायालयाने आरोपीला त्याच्या विरोधातील साक्षी पुरावा वाचून दाखवला. साक्षी पुराव्यावर आरोपीचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

माझ्याविरोधात साक्षीदारांनी खोटी साक्ष दिली आहे. मी अत्याचार केला नसून मला गोवण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय पुरावेही खोटे आहेत.
जितेंद्र शिंदे, मुख्य आरोपी