‘तो’ मृतदेह विवरा खुर्द येथील तरुणीचा

0

भुसावळ। पाडळसे-बामणोद रस्त्यावरील पाटाच्या पाण्यात 22 वर्षीय अज्ञात तरुणीचा बुधवारी मृतदेह आढळून आल्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते मात्र पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केल्यानंतर या तरुणीची ओळख पटली असून ती विवरे खुर्द, ता.रावेर येथील असल्याचे निष्पन्न झाले.

बुधवारी सकाळी 10 वाजता पाटाच्या पाण्यात 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. फैजपूर पोलिसांनी याबाबत ओळख पटवण्याचे आवाहन केल्यानंतर शुक्रवारी मृतदेहाची ओळख पटली. मयत तरुणीचे नाव वर्षा हरी तेली (22, विवरा खुर्द) असे असून पाटाच्या पाण्यात हात धुण्यासाठी ती उतरल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे यांनी दिली. शुक्रवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.