‘तो’ रस्ता केला बंद!

0

हडपसर । महापालिका काय झोपली आहे की झोपण्याचे सोंग घेत आहे? असा प्रश्‍न हडपसरमधील सामान्य नागरिकांना पडला आहे. त्याला कारणही तसेच आहे. सर्वसामन्यांसाठी येथील नागरिकांनी आपली जागा रस्त्यासाठी पालिकेला दिली. मात्र अजूनपर्यंत त्यांना पालिकेने त्या जागेचा मोबदला दिला नाही. त्यामुळे नागरिकांना रस्ता बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना फलकाद्वारे दिल्या आहेत.

हांडेवाडी ते मोहम्मदवाडी रस्त्याला पर्यायी जोड रस्ता हा खरेतर ऐतिहासिक जोड रस्ता म्हणावे लागेल. हा रस्ता परिसातील नागरिकांसाठी प्रामुख्याने वापरात असलेला मुख्य मार्ग आहे. जोड रस्ता बंद होणार हा विचारही येथील नागरिकांना बेचैन करत आहे. तसेच प्रशासनाविषयी मनात चीड निर्माण होत आहे. दोन वर्षांपासून जर जमीन मालकांना मोबदला मिळत नसेल तर प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. येथील नागरिकांना वाहतूक व्यवस्थेविषयी पहिल्याच अडचणी आहेत; त्यात ही एक भर पडली आहे असेच म्हणावे लागेल. महापालिकेने त्वरीत योग्य ते पाऊल उचलावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फोशचे वैभव माने यांनी दिला आहे.