त्यांना नकोय पुन्हा री-अपॉइन्टमेंट

0

नवी दिल्ली । अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आपल्याला पुन्हा री-अपॉईन्टमेंटची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना रोहतगी यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सरकारला लिहिले पत्र
वृत्तसंस्था बोलताना अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले, मी सरकारला पत्र लिहून सांगितले आहे की मला री-अपॉईन्टमेंट नको आहे. अ‍ॅटर्नी जनरल हे देशातील सर्वात मोठे कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. रोहतगी म्हणाले की मी माझा वेळ प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी देऊ इच्छितो. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर मे 2014 मध्ये रोहतगी यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले होते. तेव्हापासून ते या पदावर आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. रोहतगी म्हणाले की, माझ्या मते तीन वर्षांचा कार्यकाळ बराच मोठा असतो. आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करू इच्छित आहे.

अनेक मुद्द्यांवर मांडली सरकारची बाजू
अ‍ॅटर्नी जनरल रोहतगी यांनी छग-उ समवेत अनेक मुद्द्यावर सरकारची बाजू मांडली. या तिहेरी तलाकच्या मुद्द्यादेखील समावेश आहे. यावर सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. याच महिन्यात सरकारने रोहतगी यांची मुदत पुढील आदेश निघेपर्यंत वाढवली आहे. रोहतगी हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अवध बिहारी रोहतगी यांचे पुत्र आहेत. सन 2002 मधील गुजरात दंगलीविषयी गुजरात सरकारची बाजू मांडण्याचेही काम ते करत आहेत. बेस्ट बेकरी आणि जाहिरा केसमध्येही रोहतगी यांनी गुजरात सरकारची बाजू मांडली होती. 2012 मध्ये इटलीच्या दोन जणांनी केरळ समुद्रकिनार्‍यावर दोन भारतीय मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या केली होती. या विषयावरही रोहतगी यांनी इटली सरकारची बाजू मांडली होती. टू जी स्कॅममध्ये त्यांनी अनेक कॉर्पोरेट घराण्यांची बाजू मांडली आहे.