लंडन । लंडनमध्ये नुकतेच लंडन ब्रिजसह तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होते. या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेल्या पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश नागरिक खुर्रम बट हा टेनिस खेळाची पंढरी असलेल्या विम्बल्डंनमध्ये नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होता हे पोलिस तपासात उघड झाले आहे. विम्बंल्डन स्पर्धेच्या वेळीस सुरक्शा पुरवणार्या कंपनीशी बटने संपर्क साधला होता. त्यामुळे बट विम्बल्डंन स्पर्धेदरम्यान घातपात करणार होता का यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहे. द टेलिग्राफ वृत्तपत्रानुसार सुरक्षा तपास यंत्रणा आता नोकरी मिळवण्यासाठी बटने केलेल्या प्रयत्नांची चौकशी करत आहे. विम्बल्डन आणि प्रीमिअर फुटबॉल लीगमधील क्लब्जना सुरक्षा पुरवणार्या कंपनीत बट नोकरीसाठी मुलाखत देणार होता. ही मुलाखत या महिन्याच्या अखेरीस होणार होती. टेलिग्राफच्या माहितीनुसार बटला विंम्बल्डन स्पर्धेदरम्यान घातपात करायचा होता. हे हल्ले सफाईदारपणे करण्यासाठी त्याने मँचेस्टर एरिना आणि लंडन ब्रिजमध्ये हल्ले घडवून आणले. याआधी बटला वेस्टमिनिस्टर रेल्वेस्थानकात नोकरी मिळाली होती. त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासण्यात आली नव्हती हे स्पष्ट झाले आहे.
तपास यंत्रणांचा अंदाज
बटची पार्श्वभूमी तपासल्याशिवाय कुठलीही खासगी सुरक्शा संस्था त्याला नोकरी देणार नाही. पण त्यांच्याकडे पोलिसांची पाहिजे असलेले गुन्हेगार आणि एमआय फाईव्ह संस्थेच्या चौकशीचा तपशील नसतो. बट हा स्वत:च धोकादायक होताच याशिवाय तो दहशतवाद्यांना आणि संघटनांनाही मदत करायचा.
लंडन ब्रीज हल्ला
लंडन ब्रीजवर चालणार्या पादचार्यांवर एका व्यक्तिने मोटार व्हॅन चढवली होती. याशिवाय अन्य दोन ठिकाणीही हल्ले करण्यात आले होते. पोलिसांनी हे हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचे जाहिर केले होते. लंडन ब्रिजच्या जोडीने बॅरो मार्केट, वॉक्सहॉल विभागात हल्ले झाले होते. या हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता तर 48 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यांनंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये सुसाइड जॅकेट घातलेल्या आठ अतिरेक्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. तर 12 संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले होते.
मँचेस्टर हल्ला
22 मे रोजी रात्री 10.35 च्या सुमारास मँचेस्टर एरिनामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात लहान मुलांचाही समावेश होता. अमेरिकेची पॉप गायिका अरियाना ग्रँड हिचा कार्यक्रम त्यावेळी नुकताच संपला होता. या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने घेतली होती. जुलै 2007 नंतर लंडनमध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. मँचेस्टर एरिना हे युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर स्टेडियम आहे. 1995 मध्ये उभारण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये संगीताचे मोठे कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा होत असतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील काही खेळांचे सामने या स्टेडियममध्ये झाले आहेत.