त्या”३४ युवकांची आरोग्य तपासणी करुन ठेवले शेल्टर हाँलमध्ये

0

राजस्थान युवा मंडळातर्फे जेवणाची व्यवस्था

नवापूर। जुना तपासणी नाक्याजवळ गुजरात राज्यातील किंम गावात मजुरी करणारे ३४ मजूर पायी रेल्वेरुळावरुन मध्य प्रदेशात जात असतांना पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी सर्वाना ताब्यात घेऊन त्यांना प्रथम चहा पाण्याची व्यवस्था करुन नंतर राजस्थान युवक मंडळ, नगरसेविका मंगला सैन, विजय सैन, प्रकाश यादव, कलवा यादव व सहकार्याकडुन जेवणाची व्यवस्था करुन दिली. सर्व युवकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन सीमा तपासणी नाक्यावरील शेल्टर हाँलमध्ये सर्वाना ठेवण्यात आले आहे.

गुजरात राज्यातील किम गावात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे ३४ मजूर राहत असलेल्या ठिकाणाहून तीन दिवस ११० किलोमीटर रेल्वेपट्टाने पायी चालत आपला प्रवास करत नवापूर गाठले. तेथे त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन निगराणीत ठेवले. आरोग्य तपासणी करुन नेहरू उद्यानाजवळ त्यांना राजस्थान युवक मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

नवापूर शहरातील जुना आरटीओ तपासणी नाक्याजवळ गुजरात राज्यातून पायी चालत आलेल्या मध्यप्रदेशमधील युवकांना नवापूर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरिषचन्द्र कोकणी यांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना शेट्रल हॉल आरक्षित करण्यात आलेल्या ठिकाणी नवीन आरटीओ तपासणी नाक्याचा शेल्टर हॉलमध्ये निगराणीत ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन असेपर्यंत नियमित त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीत कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून आलेले नाहीत. नवापूर सुरक्षित असल्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांनी दिली. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत महत्वाची भुमिका बजावत असुन नवापूरकरांची काळजी घेत असल्याचे दिसुन येत आहे.तहसीलदार सुनिता जहाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा प्रभावी काम करत असुन समाधान व्यक्त होत आहे.