‘त्या’ अपघातग्रस्त तरूणाचे हृदयविकाराने निधन

0

लोहारा । पाचोरा येथे महारोजगार अभियानाचा फॉर्म भरण्यासाठी 22 मे रोजी नितीन पालीवाल हा तरूण जात असतांना नाईकनगरजवळ त्याची दुचाकी भर उन्हात घसरून अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला होता. अपघात झाल्याने त्याची शुद्ध हरपली होती. लोहारा येथील पत्रकार ज्ञानेश्‍वर राजपूत, दिलीप चौधरी, नाना चौधरी जात असतांना हा अपघात झालेला निदर्शनास आला अपघातग्रस्त तरूण त्याची दुचाकी एमएच-19 सीके 9152 ही घसरून त्याचा पाय त्या दुचाकीखाली अडकून त्याची शुद्ध हरपुन पडलेला दिसला. तो तरूण लोहार्‍याचा नितीन पालीवाल असल्याचे समजले. त्याचे अपघातात त्याच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते. या अपघाताची कल्पना त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यांनी अधिक उपचारासाठी पाचोरा गाठून जळगाव येथील साईलिला हॉस्पीटल येथे ऑपरेशनसाठी नेऊन उपचार केले.

याबाबतचे वृत्त 24 रोजी दैनिक जनशक्तीने प्रसिद्ध केले होते. यामुळे पत्रकारांच्या या कार्याबद्दल धाडसाबद्दल सर्वस्तरातुन कौतुकाची थाप पडली, पण काही नियतीला काही औरच मान्य असते. ऑपरेशन होऊन पलंगावर का असेना आपला मुलगा अपघातात वाचलाहेच भाग्य आई वडील कुटूंबीय समजून सममाण झालेले नियतीने अखेर धागा तोडला व त्यास पुन्हा 8 जून रोजी हृदयविकाराचा तिव्र झटका आला. जिल्हा येथे उपचारासाठी नेत असतांना रस्त्याने मृत्यू झाला. उच्च समाजातील मितभाषी परिवरातील तरूण अपघातातुन सावरला असतांना त्याचा मृत्यू झाल्याचे श्रेय अनेकांना बोचत असून हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय शोकाकुल वातावरणात त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहिण, आजी असा परिवार आहे.