‘त्या’ अपघाताप्रकरणी व्हॅनचालकावर गुन्हा

0

जळगाव – राष्ट्रीय महामार्गावरील टिव्ही टॉवरजवळ ओव्हरटेक करीत येणार्‍या पोलिस व्हॅन व दुकीचा अपघाताची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिस व्हॅनचालक असलेल्या पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाचे कामकाज आटोपून संशयीत आरोपींना जिल्हा कारागृहात घेवून येणार्‍या (एमएच १९ एम ०७१३) क्रमांकाची पोलिस व्हॅनने जळगवाहून भुसावळकडे (एमएच १९ सीसी ८८३३) क्रमांकांच्या दुचाकीला ओव्हरटेक करीत असतांना जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकीस्वार उमेश संजय वारुळे (वय-२४, रा. शनिपेठ चंदनवाडी) व जया प्रभाकर गायकवाड (वय- २६, रा. हिवरखेडा ता. जामनेर) या दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस व्हॅनवरील पोलिस कर्मचारी चालक अनिल चुडामन तायडे यांच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहे.