त्या कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा

0

जळगाव : जळगावातील काकांच्या अंत्यसंस्कारांसाठी नाशिक येथून येणार्‍या पुतणीच्या कारचा शनिवारी रात्री 9.30 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात कारने पेट घेतल्यामुळे तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच कारमधील एक, तर कंटेनरमधील तिघे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी अपघातास तसेच कारमधील तिघांच्या मरणास कारणीभुत ठरलेल्या कंटेनरचालकाविरूध्द रविवारी जळगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रजनी भामरे यांच्यांवर सुनसगाव येथे मुलाच्या उपस्थितीत अत्यंसस्कार करण्यात आले.

कारवर कंटेनर आदळला अन् कारने क्षणातच घेतला पेट
शहरातील ज्ञानदेव नगरातील हिरामण वामन विसपुते (वय 80) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी त्यांची नाशिकमधील सिडको येथील पुतणी रजनी सुभाष भामरे (वय 48) या त्यांचे पती सुभाष मन्साराम भामरे (वय 55) भामरे यांचे व्याही पंडित यादव दुसाने (वय 52) हे कारने (क्र.एमएच-15-5355) जळगावला येत होते. बांभोरी येथील गिरणा नदीचा पूल पार केल्यानंतर आहुजानगर जवळ असलेल्या वाटिकाश्रमासमोर मुंबईकडे जाणार्‍या कंटेनरचे (क्र.एनएल-01/एल-5690) ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. त्याच वेळी समोरून येणार्‍या भामरे यांच्या कारवर कंटेनर आदळला. कारने क्षणात पेट घेतला. त्यामुळे कंटेनरलाही आग लागली. कारमधून सुभाष भामरे कसेबसे बाहेर निघाले. मात्र, ते गंभीर जखमी झाले; परंतु रजनी भामरे, पंडित यादव आणि कारचालकाला कारच्या बाहेर निघता आले नाही. त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तसेच कंटेनरमध्ये बसलेल्या संगीता यमा तायडे (वय 30, रा. भुसावळ), मंगलाबाई ऊर्फ निर्मला भरत पाटील (वय 50, रा. खेडी), निर्मला अशोक जाधव (वय 25) या महिला अपघातात जखमी झाल्या होत्या.
पंडीत मंसाराम भामरे, रजनी सुभाष भामरे, भास्कर साळवे यांच्या मृत्यूस तसेच अपघातास कारणीभुत ठरलेल्या कंटेनर चालकाविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनला कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमींच्या तसेच मयतांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात गर्दी केली होती.

कंटेरनरचालकाविरूध्द गुन्हा
अपघात झाल्यानंतर कंटेनर (क्र.एनएल-01/एल-5690) वरील चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. यानंतर जमखींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रविवारी वि÷ठ्ठल पेठ येथील रहिवासी सुनिल माणिक विसपुते यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन गाठले.

दोघांचे मृतदेह नेले नाशिक येथे
अपघातातील आर्टीक कार वरील चालक भास्कर साळवे, पंडीत यादव दुसाने या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर सकाळी पावणे बारा वाजता नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. दोघांचे मृतदेह ऍम्बुलन्सद्वारे नाशिक येथे घेवुन जाण्यात आले. मुळ जळगाव तालूक्यातील रहिवासी असलेल्या रजनी भामरे(वय-45) यांचा मुलगा तुषार हा दुपारी जळगावी दाखल झाला. खासगी दवाखान्यात वडीलांना भेटत जिल्हा रुग्णालयात आईचा मृतदेह घेत नातेवाईक सुनसगाव येथे घेवुन जाण्यात येवुन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.