‘त्या’ कर्मचार्‍यांना पुन्हा पीएमपीएमएल सेवेत घ्या

0

पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर परिवहवन महामंडळ (पीएमपीएमएल) मध्ये काम करणार्‍या 14 कर्मचार्‍यांना अंपगत्वाचे कारण देत त्यांची सेवा संपुष्टात आणली आहे. या सर्व कर्मचार्‍यांना सेवा बजावत असताना अंपगत्व आले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना पीएमपीएमएलने पुन्हा सेवेत घ्यावे, असा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने केला आहे.

14 कर्मचारी सेवामुक्त
पीएमपीएल प्रशासनाने 31 ऑक्टोंबर 2017 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये 14 कर्मचार्‍यांची सेवा संपुष्टात आणली आहे. अंपगत्वाचे कारण देत त्यांची सेवा संपुष्टात आणली आहे. या सर्व कर्मचार्‍यांना सेवा बजावत असताना अंपगत्व आले आहे त्यात त्यांची काय चूक आहे? असा सवाल स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. पीएमपीएमएल महापालिका पैसे देतो. त्यामुळे प्रशासनाने कोणतेही निर्णय घेताना. विचार केला पाहिजे. परस्पर निर्णय घेतले गेले नाही पाहिजेत, अशी भूमिका सदस्यांनी घेतली.

कारवाई मागे घ्या
या कर्मचार्‍यांना त्यांच्या क्षमतेनुसार हलके काम दिले जात होते. परंतु, पीएमपीएमएल प्रशासनाने ते काम बंद करुन त्यांना कामावरु काढले आहे. कामावरुन काढताना कर्मचार्‍यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर देखील मुंडे यांना पत्र पाठविणार आहेत. या कर्मचार्‍यांना सेवा बजावत असताना अपंगत्वत आले आहे. त्यात त्यांची काही चूक नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घ्यावी. माणुसकीच्या भावनेतून पुन्हा या 14 कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. त्याबाबतचा ठराव देखील समितीने केला आहे.