‘त्या’ ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश

0

जळगाव । पारोळा तालुक्यातील पिंप्री (प्र. उत्राण) येथील तत्कालीन ग्रामसेवक दिलीप काशीराम पाटील याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

ग्रामसेवक दिलीप पाटील यांनी सन २००० ते २०१० या काळात सरकारी नोकरी करताना मोठ्या प्रमाणावर अपहार व आर्थिक लाभ मिळवल्याची तक्रार गुलाब पाटील यांनी केली आहे. यात दिलीप पाटील यांनी शासकीय जमीन त्याच्या नावावर करून त्याची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात चौकशी अहवाल देवूनही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. यामुळे आता दिलीप पाटीलवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.