वर्णभेदाला चित्रपटसृष्टीत स्थान नाही ही बाब आता स्पष्ट झाली असली, तरीही फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्याचं प्रस्थ मात्र सुरूच आहे. मुख्य म्हणजे बरीच प्रसिद्ध कलाकार मंडळी सर्रासपणे या जाहिरातींमध्ये झळकत आहेत. याविषयीच काही महिन्यांपूर्वी अभिनेता अभय देओलने आवाज उठवला होता. ‘वोग’ या फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने फेअरनेस क्रीमच्या मुदद्यावर तिचे मत मांडले. मुख्य म्हणजे फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम केल्याचा आपल्याला पश्चात्ताप असल्याचेही तिने स्पष्ट केले. ‘गव्हाळ वर्णाच्या बर्याच मुलींना, ‘अरेरे तिचा वर्ण कसा आहे, बिचारी ती’ अशा बर्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. तुमची त्वचा एका आठवड्यातच उजळण्यासाठी बर्याच क्रीम्सची जाहिरात करण्यात येते. मीसुद्धा अगदी किशोरवयीन अवस्थेत अशा क्रीम्स वापरायचे. अभिनय क्षेत्रात जेव्हा मी सक्रिय झाले, तेव्हा 20 वर्षांची असताना मी एका क्रीमची जाहिरात केली होती. त्यात मी स्वत:च्या वर्णाविषयी संकुचित असणार्या मुलीची भूमिका साकारली होती.