‘त्या’ तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असलेले दोन्ही भामटे ताब्यात

0

जळगाव । सचखंड एक्स्प्रेसने रेल्वेने स्थानक सोडल्यावर दारात थांबून बोलणार्‍या तरुणाचा मोबाईल हिसकावतांना मोबाईलसह त्यालाही खाली ओढून घेतले होते. त्यात तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या भामट्यांचा शोध घेण्यास रेल्वे पोलिसांना यश आले आहे. दोन संशयितांची ओळख पटली असून दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. नाजीम पटेव व भिका तडवी असे दोन्ही संशयित चोरट्यांची नावे आहे. दोन्ळी गेंदालाल मिल येथील आहे.

चौवीस तासात दोघांना घेतले ताब्यात
ग्वालीअर येथे शासकीय महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या नरेश चंद्रप्रकाश जैस्वाल (वय 19,रा.औरंगाबाद) हा विद्यार्थी रेल्वेबोगीच्या दारात बसून बोलत असताना मोबाईल चोरट्यांनी त्याला कानाला लागलेल्या मोबाईलसह खाली ओढल्याने त्याचा दुदैवी अंत झाला. गुन्हा घडल्यानंतर नेहमीप्रमाणे आकस्मिक मृत्यूच्या तयारीत असलेल्या लोहमार्ग पिोलसांना मृत्युमागचे कारण समजल्यावर खळबळून जाग आली. भुसावळ लोहमार्ग, गुन्हेशाखा, जळगाव औटपोस्टच्या संयुक्त मोहिमेत गुन्ह्यातील चोवीस तासांत गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. यावेळी चौकशीत नाजीम पटवे व भिका तडवी दोन्ही राहणार गेंदालाल मिल असे नाव समोर आली आहे. यावेळी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

असा घडला गुन्हा
नरेश चंद्रप्रकाश जैस्वाल (वय-19) व त्याचा मित्र अपूर्व रघुनाथ जानवा (वय 19) हे दोघे तरुण औरंगाबाद येथून सचखंड एक्स्प्रेसने ग्वाल्हेरला निघाले होते. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास सचखंड एक्स्प्रेसने जळगाव स्थानक सोडले. गाडी निघाल्यानंतर नरेशच्या मोबाईलवर कॉल आला. मात्र, नेटवर्क नसल्याने नरेश बोगीच्या दारात येऊन बसला. गाडी काही अंतर पुढे गेल्यानंतर शिवाजीनगर पुलाखाली दडून बसलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने नरेशच्या कानाजवळून मोबाईल हिसकावला. काही करण्याआधीच नरेश मोबाईलसोबत खाली ओढला जाऊन रेल्वेखाली सापडला. घटनेनंतर पूर्वी पासूनच दुचाकीवर तयार बसलेल्या त्याच्या साथीदाराने आरोळी मारल्याने संशयित दुचाकीच्या दिशेने पळत जाऊन विनानंबरच्या काळ्या-लाल रंगाच्या दुचाकीवरून पळून गेले. अपूर्व जानवा याच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसात जबरीलूट, मृत्यूस जबाबदार असल्या प्रकरणी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.