त्या तरुणीस मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी

तालुक्याीतील किनगाव येथील तरुणा सोबत पैसे घेत लग्न करून फसवणूक करणाऱ्या त्या फरार झालेल्या नववधु तरुणीस पोलिसांनी अटक केली असुन येथील न्यायालयात तिला हजर केले असता तिला मंगळवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धनजंय हिरालाल सोनार या तरूणाचा यशवंत उर्फ दादु विजय पाटील रा. सांगवी खुर्द यांची मनलेली बहिण सरीता प्रकाश कोळी रा. अंजाळे हीच्या सोबत विवाह निश्चित झाला होता. या विवाहा करीता सव्वा लाख रूपये द्यावे तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरवण्यात आले व ठरल्या प्रमाणे ८५ हजार रूपये देण्यात आले. उवर्रित रक्कम नंतर देणार होते तर १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू आंळदी पुणे येथील अलंकापुरी मंगल कार्यालय पुणे येथे लग्न झाले व लग्नाच्या सात दिवसा नंतर यशवंत उर्फ दादु विजय पाटील हा किनगाव येथे आला व वधु मुलगी सरीता कोळी हिला तिच्या आईला भेटण्यासाठी घेवुन जातो असे सांगुन घेवुन गेला तेव्हा पासुन तो परत आला नाही. तेव्हा या दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात होता यात वनवधु सरिता हीला पोलिसांनी बेळ्या ठोकल्या असुन तीला शनीवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश एम. एस. बनचरे यांच्या समोर हजर केले असता तीला मंगळवार पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे