‘त्या’ दोन्ही शिक्षकांची बदली न होण्याची मागणी

0

अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील दोन्ही शिक्षकांची बदली रद्द करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थानीं गट शिक्षणाधिकारी ए.डी.पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील शिक्षक एस.एफ.पावरा व ए.के.सोनवणे यांची शाळा अंतर्गत किनोट ता जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. ते दोन्ही शिक्षक अतिशय मनमिळावू असून विद्यार्थ्याचे लाडके आहेत.

कळमसरे येथील शारदा माध्य. शाळेत आंदोलन प्रकरण
या दोन्ही शिक्षकांनी त्यांच्या स्वखर्चातुन विद्यार्थ्यासाठी वाचनालय उघडले असून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ते रात्र दिवस झटत असतात. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या निषेदार्थ 20 रोजी विद्यार्थ्यांनी आंदोलन करून दोन्ही सत्रातील शाळा बंद पाडून शालेय पोषण आहारावर हि बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सदर शिक्षकांची बदली रद्द न झाल्यास आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करू, असा लेखी इशारा ग्रामस्थ व पालक यांनी गट शिक्षणाधिकारी ए.डी.पाटील यांना निवेदन देऊन दिला आहे. निवेदनावर विजय चौधरी, भरत महाजन, प्रशांत कुंभार यांच्यासह शाळेतील 200 ते 250 विद्यार्थी विद्यार्थिनीच्या स्वाक्षर्‍या आहेत.