‘त्या’ नगरसेवकांना जामीन मंजूर

0

भुसावळ। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्त वाचनावरुन गोंधळ घालत मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपी असलेले जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे व संतोष चौधरी (दाढी) हे तीनही नगरसेवक पोलिसांना शरण आले. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असता शुक्रवार 7 रोजी जामीन मंजूर करण्यात आला.

सोमवारी पोलिसांना आले होते शरण
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील विषयांचे पूर्णपणे वाचन करण्याच्या कारणावरुन गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवींद्र सपकाळे आणि नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) या तीनही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालून मुख्याधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याची तक्रार बाविस्कर यांनी पोलीस स्थानकात दाखल केली होती. यावरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर तीनही नगरसेवक फरार झाले होते. त्यांचा जामीन अर्ज सोमवार 3 रोजी फेटाळण्यात आला. अखेर 5 रोजी हे तीनही नगरसेवक बाजारपेठ पोलिसांना शरण आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर पुन्हा 7 रोजी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या दालनात अर्ज दाखल केला असता जामीनास मंजूरी मिळाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सोनवणे यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.