‘त्या’ नगरसेवकास अपात्र करा

0

चाळीसगाव । नगरसेवक पदाचा गैर वापर करून विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या बांधकाम करणार्‍या व बांधकाम करून विक्री करणार्‍या चाळीसगाव येथील भाजपच्या नगरसेवकाचे पद रद्द करावे अशी मागणी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नारायण जेठवानी यांनी नगर परिषद चाळीसगाव मुख्याधिकारी यांच्या कडे केली असून मंगळवार 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. चाळीसगाव येथील सिंधी कॉलनीतील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नारायण सिरूमल जेठवानी यांनी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शेखर कन्हैयालाल बजाज यांच्या विरोधात चाळीसगाव नगर परिषदेमध्ये तक्रार केली आहे. या तक्रारीत नगरसेवक पदाचा गैर वापर केल्याचे म्हणत त्यांनी शहरातील गणेश रोडवर गणेश कॉम्प्लेक्सचे 5 सहकार्‍यांच्या मदतीने बांधकाम केलेले आहे. सदर बांधकाम करतांना कराराप्रमाणे 25 टक्के बांधकाम नागरपरिषदेस मोफत दिली पाहिजे, कॉम्प्लेक्ससाठी नकाशा मंजूर करून त्या प्रमाणे बांधकाम केले व कॉम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवून त्या नंतर कॉम्प्लेक्समध्ये तोडफोड करून बेकायदेशीर अतिरिक्त गाळे बांधून विक्री केले आहे.

पदाचा गैरवापर करून अतिक्रमण केल्याचा आरोप
त्याचप्रमाणे मैत्रेय प्लॉटिंग सेव्हिसेसला तिसर्‍या माळ्यावर गाळे विकून 25 टक्के बांधकाम नगर पालिकेस दिले नाही व पदाचा गैर वापर केला आहे. त्याच प्रमाणे ते चाळीसगाव येथील बाबा हरदास राम सिंधी एजुकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहे व ही संस्था इंदिरा गांधी सिंधी हायस्कुल व स्व. चदीराम इंग्लिश मेडीयम स्कूल चालविते. ते समाजाचे अध्यक्ष असून सदर संस्थेच्या मालकीची सिंधी कॉलनी चाळीसगाव येथे अनाधिकुत 3 मजली इमारत आहे. तसेच संस्थेची अतिक्रमण करून बांधलेले स्व चंडीराम बजाज स्मृती हॉल व इंदिरा गांधी सिंधी हायस्कुल चे अतिक्रमण केलेले प्ले ग्राउंड केलेल्या या मिळकती आहेत.

नगरपालिकेच्या इमारतीत बेकायदेशीरपणे केली शाळा सुरू
सदर नगरसेवक हे चेअरमन असलेल्या बाबा हरदास राम सिंधी एजुकेशन सोसायटी या संस्थेने इंदिरा गांधी सिंधी हायस्कुल मध्ये 5 ते 10 वर्गापर्यंत शासन मान्यता घेऊन शाळा सुरु केली होती. 1 ते 4 वर्ग चाळीसगाव न पा प्राथमिक शाळा न पा च्या वेगळ्या इमारतीत चालू होती. परंतु त्यांनी न पा शाळेची जागा स्वतःच्या संस्थेकडे वर्ग करून इंदिरा गांधी सिंधी हायस्कुल या शाळेमार्फत 1 ली ते 10 वी पर्यंत शिक्षण सुरु केले आहे. सदर प्राथमिक शाळेची जागा नगर परिषदेने सिंधी मेडीयम शाळेसाठी संस्थेला दिली होती, परंतु त्यांच्या संस्थेने सदर सिंधी प्राथमिक शाळा बंद करून स्व. चदिराम के बजाज इंग्लिश स्कुल या नावाने इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा सदर नगरपालिकेच्या इमारतीत बेकायदेशीर पणे सुरु करून नगर परिषदेची जुनी कौलारू बांधलेली इमारत पडून विनापरवानगीने बेकायदेशीरपणे पक्के स्लॅबच्या खोल्यांचे बांधकाम केले आहे. त्यास नगर पालिकेची परवानगी घेतलेली नाही व नकाशा तयार करून संबंधित खात्याकडून मंजुरी घेतलेली नाही अश्या प्रकारे शेखर बजाज यांनी त्यांच्या नगर सेवक पदाचा दुरुपयोग केल्याचे म्हंटले आहे. यासह आदी आरोप त्यांचे विरोधात करण्यात आले आहेत. नारायण जेठवानी यांनी नगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीवरून दि 27 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीस दोघांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी सांगितले आहे.

माझ्या विरोधात केलेल्या तक्रारी खोट्या व तथ्यहीन आहेत. आमच्या संस्थेच्या त्यांचे विरोधात नाशिक येथे केसेस चालू आहेत. त्या केस आम्ही कडून घ्याव्यात म्हणून आम्हाला ब्लॅक मेल करण्याचा आहे प्रकार आहे. मी नगरसेवक पदाचा कुठलाही गैर प्रकार केलेला नाही
– शेखर बजाज, नगरसेवक चाळीसगाव