‘त्या’ नराधमांना फासावर द्या

0

धुळे । शहरातील मिल परिसरात असलेल्या राऊळवाडी भागातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने सतत अत्याचार केला. दरम्यान या कृत्यासाठी त्याच्याच दोन नातलगांनी त्याला सहकार्य करुन वेळोवेळी मदत केली होती. मुलीच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार बलात्कारी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी व पिडीत मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करीत मोठ्या संख्येन एकत्र येऊन स्त्रीपुरुष यांनी 30 रोजी मोर्चा काढून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.राऊळवाडी भागातील पिडीत 17 वर्षीय तरुणी अत्यंत गरीब घरातील असून तिचे माता-पिता मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलगी घरी एकटी असतांना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. सतीश विजू इंगोले याने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिला घरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तर शरद इंगोले व राजू इंगोले या दोघांनी घरावर पाळत ठेवण्याचे काम केले. त्याच्या कृत्याने ती अल्पवयीन तरूणी गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. मुलीवर अत्याचार करण्यात आल्याने नागरिकांनी मोर्चा काढून याचा निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

आंदोलनात सहभागी नागरिक
निवेदनावर रेखा सुपनर, सुरेखा सुपनर, चंदाबाई सुपनर, इंदुबाई सुपनर, जनाबाई सुपनर, नंदीनी सुपनर, रेश्माबाई सुपनर, सुमनाबाई सुपनर, आशाबाई सुपनर, पल्लवी सुपनर, सुनिता पदमर, नंदा काळे, लताबाई सरगर, संगीता सुपनर, शंकर दयाराम सुपनर, गणेश सुपनर, संजय सुपनर, सुनिल भवरे, महेंद्र धोंडे, महेश भोपे, मारुती सुपनर, सचीन भवरे, संदीप सुपनर, घनश्याम पदमर, रवींद्र सुपनर,दीपक सुपनर, मनोश पिसे, दिपक धोंडेवाले, चतुर सुपनर, भटू सुपनर, गणेश मोरे, भैय्या कोळी, सुनिल सुपनर, मोनू हरळ, प्रवीण खताळ, गोलू सुपनर, ज्ञानेश्‍वर मोरे, तुकाराम सुपनर, भावडू सरगर, सागर मोरे, पवन सुपनर, दिनेश सरोदे, भटू सुपनर, गुलाब सुपनर, मधुकर पदमर, लखन गोराड,मनोज गर्दे,बंटी मासुळे,विनोद खेमणार,छोटू थोरात,कैलास गर्दे,दिपक शेंडगे आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

आरोपींना अभय देऊ नय
सतिश इंगोलेकडून सतत अत्याचार केला गेल्याने ही तरुणी 4 महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब रुग्णालयात उघडकीस आल्यावर पिडीत मुलीने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे कळल्यावर नागरिकांनी नराधाम आरोपली कठोरातील कठोर शासन व्हावे अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना केली आहे. आरोपीने पिडीतेचा गैरफायदा घेवून सतत अत्याचार केल्याने शुक्रवारी महिला व पुरूषांनी मोठा मोर्चा काढत त्या नराधम आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, आरोपींना कोणतेही अभय दिले जाऊ नये अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.