जळगाव – धरणगावातील सहा वर्षीय चिमुकलीवर एका 62 वर्षीय वृध्दाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्याला काळे फासून चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांच्या सतर्कतेने महिलांचा हा प्रयत्न फसला
धरणगाव शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षीय चिमुकलीवर एका 62 वर्षीय वृध्दाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार, दि.20 फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीला आला होता. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली होती. मंगळवारी, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी आले असता शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने संशयित आरोपीला काळे फासून चोप देण्याचा प्रयत्न झाला. परंतू पोलीसांच्या सतर्कतेने महिलांचा हा प्रयत्न फसला