त्या पत्राशेड, भंगार दुकानांवर कारवाई करणार

0

आढळरावांच्या आरोपानंतर आयुक्तांनी घेतली भूमिका
पिंपरी-चिंचवड :मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले होते. ‘जीवाला घाबरून भोसरीतील अनधिकृत टपर्‍या आणि चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकानांवर आयुक्त कारवाई करत नाहीत’, असा आरोप त्यांनी केला होता. हे चांगलेच जिव्हारी लागल्याने पुरेसा पोलिस बंदोबस्त करून तात्काळ कारवाई करणार असल्याची भूमिका महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी मांडली.

स्मार्ट सिटीकडे ही वाटचाल?
शहराची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे होत आहे. तर दुसरीकडे अनधिकृत टपर्‍या, पत्राशेड यामुळे काही परिसरांमध्ये बकालपणा वाढला जात आहे. विशेषतः भोसरी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरामध्ये या अनधिकृत टपर्‍या आणि पत्राशेड तसेच भंगार दुकानांची संख्या जास्त आहे. बेकायदेशी अतिक्रमण वाढत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे गुंडगिरीचे प्रमाण आणि हफ्तेखोरीचे प्रमाण वाढले आहे.

शहराच्या बकालपणात वाढ
एखाद्या ठिकाणी व्यावसायिकाने अनधिकृत अतिक्रमण केले, की याची संख्या वाढत जाते. कारवाई करताना अनेक वाद वाढले जातात. अनधिकृत पत्राशेड आणि टपर्‍यामुळे नुकतेच संत तुकाराम नगरमध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे. अतिक्रमणाच्या वेळी नागरिक अंगावर येत असल्याने कारवाई करत नसल्याचे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले. मात्र कारवाई न केल्याने शहराचा दिवसेंदिवस बकालपणा वाढत जातो आहे.विशेषतः चिखली, कुदळवाडी परिसरातील प्लॅस्टीक व्यावसायिकांनी केमिकल्सयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडल्यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. या परिसरातील नागरिक थेट पंतप्रधानाकडे तक्रार करत आहेत. मात्र महापालिका आपली जबाबदारी टाळत आहे. यावर मंत्रालय, एमआयडीसी, प्रदुषण मंडळ, महापालिकेची एकत्रित बैठक घेवून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती खासदारांनी दिली होती.