जळगाव । एमपीडीएची कारवाई करून जिल्हाधिकार्यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश दिल्याने अमळनेर येथील वाळू व्यावसायीक तसेच शहर विकास आघाडीचा नगरसेवक घनश्याम उर्फ श्यामकांत पाटील (वय-31) यास स्थानबध्द केल्याची माहिती अमळेनर पोलीसांनी जळगावला वरीष्ठांना दिली. परंतु प्रत्यक्षात संशयीत निसटल्याने पोेलीसांच्या कार्यपध्दतीवरच सवाल उठला असून या घटनेची गंभीर दखल घेतली.
अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी गुरूवारी दिली.
संशयीताला पकडण्याचे बिंग फुटले
जिल्हाधिकार्यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश काढल्याने घनश्याम पाटील यास अटक करून त्याची नाशिक कारागृहात रवानगी झाली, अशी माहिती समोर आली होती.दरम्यान त्याचवेळी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेची संशयीतास पकडण्यासाठी मदतीची अपेक्षा अमळनेर पोलीसांनी व्यक्त केली होती. यातूनच मग संशयीताला पकडण्याचे बिंग फुटले. पथक पोहोचण्यापूर्वीच संशयीत अमळनेरमधून पसार झाल्याने पोलीस खात्यातूनच गोपनीय माहिती संशयीपर्यत पोहोचली, अशीही खासगीत चर्चा आहे. याप्र्रकाराने पोलीस अधीक्षक भडकले असून याप्रकरणाची उपविभागीय पोलीस अधीकारी रमेश पवार यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली असून त्यांना शुक्रवारपर्यत अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी गुरूवारी दिले. संशयीत घनश्याम पाटील याच्याविरूध्द अवैध वाळू चोरीचे 04, सरकारीकर्मचार्यावर हल्ला 02,जमावबंदी व जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन 02,गर्दी करून दंगल घडवून आणणे, 01,जातिवाचक शिवीगाळ ,जीवे ठार मारण्याची धमकी देणे 01 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस डायरीत नोंदविले गेले आहेत.