पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील एका उच्चपदस्थ अधिका-याने एका महिला कर्मचा-याला त्रास दिला असल्याच्या बातम्या येत आहेत. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करणे गरजेचे होते. परंतु, आयुक्तांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. त्या अधिका-याला आयुक्त पाठीशी घातले जात आहे. रजेवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी हे प्रकरण दाबले असल्याचा आरोप, नगरसेविकानी महासभेत केला आहे. चर्चा सुरू असताना आयुक्तांचे तोंडावर बोट होते. त्यामुळे नगरसेविकांनी आयुक्तांचाही निषेध केला.
महापालिकेची मे महिन्याची तहकूब सभा आज (शुक्रवारी) सुरु आहे. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्ष स्थानी होते. सभेच्या सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला नगरसेविकांनी वाचा फोडली.