प्रकरण न्यायप्रविष्ट ; जावेदखान अरशदखान यांचा खुलासा
भुसावळ- खोट्या कागदपत्रांद्वारे प्लॉट हडपल्याची तक्रार शहरातील मो.अय्युब मो.मसुद यांनी जिल्हाधिकारी तसेच लोकायुक्तांकडे केली होती मात्र तक्रारदारांचा आरोप तथ्यहीन असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्लॉट आपल्याच मालकिचा असल्याचा दावा जावेदखान अरशदखान यांनी लेखी कागदपत्रांद्वारे केला आहे. भुसावळ पालिका हद्दीतील सर्वे नं.53/3/1/2 पैकी प्लॉट नंबर एक हा सुशीलाबाई केशवराव रामवंशी यांच्याकडून 20 एप्रिल 2013 रोजी रजिस्टर खताने खरेदी केला होता मात्र प्लॉट खरेदी केल्यापासून अरशद खान अल्लादित्ता खान (मयत) व वारस जावेद खान अरशद खान व इतरांनी त्या प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला मात्र हा आरोप तथ्यहिन, बिनबुडाचा असल्याचा खुलासा या प्लॉटचे वारस जावेदखान अरशदखान यांनी केला आहे. भुसावळ न्यायालयाने तसेच प्रांताधिकार्यांनी आपल्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांनी कळवले आहे. शिवाय पुन्हा या प्रकरणात भुसावळ सत्र न्यायालयात संबंधिताविरोधात दावा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. तक्रारदार मो.अय्युब मो.मसुद यांचे सातबार्यावरदेखील नाव नसल्याने त्यांचा मालकी हक्काशी दुरान्वये संबंध येत नसल्याचे जावेदखान अरशदखान यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.