‘त्या’ फोटोमुळे बिग बी झाले ट्रोल

0

मुंबई : भारतात दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, कलाकार आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेशही देतात.

अशात बिग बींनी जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि नात आराध्याचे फुलबाजा हातात घेतलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे बिग बी चांगलेच ट्रोल झाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार दिवाळीत प्रदूषण होऊ नये म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देत असतात. मात्र, तुमच्यासारख्या सेलिब्रेटींनीच फटाके फोडून दिवाळी साजरी केल्यास सामन्यांनी काय आदर्श घ्यावा असा थेट सवाल नेटकऱ्यांनी अमिताभ यांना केला आहे.

एकंदरीतच अमिताभ यांना कुटुंबासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. आता बिग बी नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर काय उत्तर देणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.