चारित्र्यावर संशयावरून पतीने लोखंडी हत्याराने डोक्यावर केले होते वार
जामनेर पोलीसात पतीविरोधात गुन्हा
अडावद । जामनेरात शिक्षक कॉलनी भागात एका खाजगी दवाखान्यात काम करणार्या महिलेचा पती सोबत झालेल्या पैशाच्या वादातून काल 3 तारखेला पतीकडून केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात डोक्यात मार लागून गंभीर जखमी झालेल्या. महिलेचा जळगाव येथे उपचारा दरम्यान म्रुत्यु झाला आहे. यामुळे पोलिस ठाण्यात या घटनेबाबत शनिवारी रात्री महिलेचा पतीच्या विरोधात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिक माहिती अशी की, 3 फेब्रुवारी रोजी 1.30 वाजता जामनेर शहरातील शिक्षक कॉलनी भागात प्रकाश शेणपडू मुळे यांच्या घरासमोर बोळीमध्ये यातील फिर्यादी प्रभाबाई नीना कोळी (वय-60) यांच्या जावई अनिल चावदस सपकाळे याने त्याचे पत्नी मनीषा अनिल सपकाळे वय-20 रा. शिक्षक कॉलनी जामनेर हिच्या चारित्र्यावर संशय घेवुन काही तरी लोखंडी हत्याराने मनीषा अनिल सपकाळेच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुन्ह्यास 302 हे कलम वाढवून लावण्यात आले होते. आरोपी अनिल चावदस सपकाळे गुन्हा केल्या बरोबर घटनास्थळावरून पळून गेला होता.
गुप्त माहितीनुसार केली कारवाई
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी जळगाव- धरणगाव- चोपडा मार्गे धानोरा तालुका चोपडा येथे गेला आहे. त्याप्रमाणे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना सूचना व मार्गदर्शन करून सपोनि राजेश काळे, पोहेका इस्माईल शेख, रामदास कुंभार यांना आरोपीचे शोध कामी रवाना केले होते. बातमी प्रमाणे आरोपी अनिल चावदस सपकाळे यास सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेले आहे.