‘त्या’ महिलेचा मृतदेह आणला तहसील कार्यालयात

0

चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे शिवारातील शेतात बिबट्याने अचानकपणे हल्ला करून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. आज त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी चाळीसगाव तहसील कार्यालयात आणून ठेवला. सकाळी 11 वाजता मृतदेह आणल्यानंतर तहसील कार्यालसमोरील रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. जोपर्यंत बिबट्याला मारण्याचे आदेश येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतीमसंस्कार करण्यात येणार नाही असा पवित्रा नातेवाईक व माजी आमदार राजीव देशमुख, आमदार उन्मेश पाटील यांच्यासह सर्वपक्षिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जिल्हा वन संरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. उपस्थिती नागरीकांसह नातेवाईकांनी बिबट्याला ठार मारण्याची जोरदार मागणी केली आहे. यावेळी बिबट्याला ठार मारण्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. यावेळी तहसील आवारात मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

तहसील कार्यालयासमोर बसलेले सर्व नातेवाईक

 

चाळीसगाव पोलिसांचा तहसील कार्यालयासमोर असा ठेवला चोख बंदोबस्त