‘त्या’ महिलेची ओळख पटली

0

जळगाव । फैजपूरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येत असलेली प्रवासी अ‍ॅपे रीक्षा समोरून येणार्या कारवर आदळून झालेल्या अपघातात महिला प्रवासी जागीच ठार झाली तर अन्य 12 प्रवासी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आमोद्याजवळ झाला. या अपघातात सुनीता प्रकाश भंगाळे (50, चिनावल) ठार झाल्या होत्या. या अपघातात वसुंधरा नेमीचंद भांगाळे (वय-65) रा. गवतबाजार माळीवाडा सावदा महिलेचा देखील त्याच दिवशी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र त्यांची दोन दिवसांपर्यंत ओळख पटविणे शक्य होत नव्हते. मात्र ओळख पटविण्याकामी पोहेकॉ पुरूषोत्तम वाधळे यांनी सावदा पोलीसांशी संपर्क साधुन मयत महिलेचा फोटो व्हाटस्अ‍ॅप पाठविला होता. नुसार शोध घेतला असता त्या सावदायेथील रहिवाशी आहेत. त्या 8 रोजी बामणोद येथील बहिणीकडे भेटण्यासाठी जात होत्या. मयत महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.