’त्या’ महिलेची हत्या

0

पुणे । कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्च महिन्यात डोक्यात दगड घातलेल्या आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. त्याचा छडा लागला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पत्नीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करीत असल्याच्या संशयातून त्या महिलेची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हृषिकेश श्रीकांत गाडे (वय 22, रा. अप्पर इंदिरा नगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र विकी दुसर्‍या एका गुन्ह्यात नाशिकच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

संबंधित महिला आपल्या पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत आहे, असा संशय विकीला आला होता. त्यामुळे त्याने हृषिकेशच्या मदतीने तिचा खून केला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हृषिकेश हा देखील सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र लुटल्याचा आरोप आहे.