मुंबई: गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंट जवळील कोंबड पद येथे एका अंदाजे 45 वय वर्ष असलेल्या महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. ही हत्या एमआयडीसी परिसरात घडली असून शारिरीक संबंध नाकारल्यामुळे याच परिसरात काम करणार्या एका सुरक्षा रक्षकानेच महिलेची हत्या केल्याचे समोर आंले आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाला आणि या कामात मदत करणार्या त्याच्या तीन साथिदारांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6 च्या दरम्यान पोलिसांना कोंबड पाड्यात रस्त्याचा बाजूला जगलात श्रद्धाबाई हटकर या महिलेचा मृतदेह आढळला होता. ही महिला एम आय डीसी भागातील असून घरकाम करते. या महिलेचा पती जिवंत नसून तिला त्याच परिसरात काम करणार्या एका सुरक्षा रक्षकाने शारिरीक संबंधांची मागणी केली होती. मात्र, तिने याला नकार दिल्याने आपल्या तीन साथिदारांच्या मदतीने तिची हत्या करुन रात्रीच्या वेळेस जंगल भागात आणून टाकले. एक दिवस आधीच या महिलेच्या मुलाने या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार एम आय डीसी पोलीस स्टेशनला नोंदवली होती.